कापडगाव येथे कंटेनर उलटून अपघात; चालक जखमी

रत्नागिरी:– मुंबई-गोवा महामार्गावरील पाली येथील कापडगाव येथे कंटेनर उलटून अपघात झाला. अपघाताची ही घटना मंगळवार 11.45 वा. सुमारास घडली असून त्यात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दिलीप कुमार (26,रा.उत्तरप्रदेश) असे कंटेनर चालकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी तो आपल्या ताब्यातील कंटेनर (एमएच-03-सीव्ही-5092) घेउन भरधाव वेगाने जात होता. तो पाली येथील कापडगाव येथे आला असता त्याचा कंटेनरवरील ताबा सूटला आणि तो उलटून हा अपघात झाला. कंटेनर उलटल्यामुळे चालक दिलीप कुमार कंटेनरच्या केबीनमध्ये काही काळ अडकून पडला होता. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाला केबीनमधून बाहेर काढून त्याला जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवले. त्यानंतर पोलिसांनी कंटेनर बाजुला करत तेथील वाहतुक सुरळीत केली.