रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे मावळतली येथे किरकोळ कारणातून चुलत्याला हातांच्या थापटांनी तसेच लोखंडी कुदळाने मारहाण केल्याप्रकरणी पूतण्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना रविवार 18 जून रोजी दुपारी 3.15 वा.सुमारास घडली.
स्वप्निल बाळू पाचकुडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात फिर्यादीेन दिलेल्या तक्रारीनुसार,स्वप्निल घरात कोणाचेही काही ऐकत नाही.लहान-सहान गोष्टींवरुन घरच्यांना दमदाटी व मारहाण करणे असे प्रकार करत असतो.रविवारी स्वप्निलने आपल्या चुलत्याला एकाला मारायचे असून तुम्ही माझ्या सोबत चला असे सांगितले.त्यावर त्यांनी नकार दिल्याच्या रागातून स्वप्निलने त्यांना जबर मारहाण केली.याप्रकरणी त्याच्याविरोधात भादंवि कायदा कलम 324, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









