काँक्रिटच्या कामात अडथळा; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर झाडगाव येथील बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये फ्रिमिक्स काँक्रिटचे काम करत असताना चार जणांनी सांडपाण्याच्या चेंबरमध्ये दगडी टाकून फिर्यादीचे अडीच लाखांचे नुकसान केले. ही घटना रविवार 18 जून रोजी दुपारी 1 वा.घडली.

जमीर पागारकर, त्याची पत्नी आणि अन्य एक महिला व अन्य एकजण या चार जणांविरोधात फिर्यादीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवार दुपारी फिर्यादींच्या नावे असलेल्या आर्चित गॅलेक्सी बिल्डिंगच्या पार्किंगच्या ठिकाणी फ्रिमिक्स काँक्रिंटचे काम करत होते. त्यावेळी या चारही संशयितांनी त्याठिकाणी अनधिकृतपणे येउन फिर्यादीच्या जागेतील सांडपाण्याच्या चेंबरमध्ये दगडी टाकून 2 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान केले.याप्रकरणी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 447,472,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.