कळंबस्ते येथील युवकाची गळफास घेत आत्महत्या

संगमेश्वर:- तालुक्यातील कळंबस्ते मोहल्ला येथील अर्थ अय्याज नेवरेकर या १७ वर्षीय तरुण युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. त्याने अचानक असे का? पाऊल उचलले हा अनुत्तरित प्रश्न अनेकांना सतावत असून त्याच्या अशा अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करणेत येत आहे.

संगमेश्वर पोलिसांकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार बुधवार ता. २६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अर्श अय्याज नेवरेकर यांनी आपल्या राहत्या घरातील एका खोली मधील सिलिंग पंख्याला ओढणीने स्वतःच्या गळ्याला फास लावून घेतल्याचे शेजारील अरबाज मुरतूझा नेवरेकर यांना दिसून आले.

अरबाज नेवरेकर यांनी त्यांच्या शेजारील नासीर उस्मान दसूरकर यांना अर्थ याने गळफास लावल्याचे दिसून आले याची माहिती दिली असता नासीर दसुरकर यांनी खात्री करण्याच्या उद्देशाने घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता अर्थ हा पंख्याला लटकताना त्यांना दिसून आला, मात्र तो जीवित असेल असा त्यांचा समज झाल्याने नाशीर दसूरकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याला खाली उतरवले आणि तात्काळ स्थानिक डॉक्टर श्री, नगारजी यांना बोलावण्यात आले.