Wednesday, May 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी कलमाच्या खड्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू

कलमाच्या खड्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- नाटे (ता. राजापूर) पडवणेवाडी येथील बेपत्ता झालेली वृद्ध महिला पडवणेवाडी- मुरकुंडा या ठिकाणी कलमाच्या खड्यात मयत स्थितीत आढळली. शशिकला कृष्णा आंबोळकर (वय ८९, रा. नाटे पडवणेवाडी, ता. राजापूर, रत्नागिरी) असे वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता.४) सकाळी साडेअकराच्या सुमारास नाटे पडवणेवाडी, येथील मुरकुंडा येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध शशिकला या १ जून ला सकाळी साडेनऊच्या सुमारास घरातून निघून गेल्या होत्या त्या परत आल्या नाही म्हणून नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र त्या सापडल्या नाहीत या प्रकरणी नातेवाईकांनी नाटे पोलिस ठाण्यात खबर दिली होती. खबरीवरुन पोलिसांनी बेपत्ताची नोंद केली होती. मात्र नातेवाईक प्रकाश आंबोलकर बुधवारी सकाळी त्यांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले असता पडवणेवाडी-मुरकुंडा या ठिकाणी शशिकला आंबोळकर कलमाच्या छोट्या खड्यात मयत स्थितीत आढळल्या. या प्रकरणी नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.