रत्नागिरी:- पेन्शन चालु करण्यासाठी भाऊ मुंबईला गेल्याच्या रागातून पुतण्या, पुतणी आणि भावजयेला तिघा काकांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी तिघा काकांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार 25 जुलै रोजी सायंकाळी 6 वा.कर्ला येथे घडली.
नझीर डोंगरकर, कासममियाँ डोंगरकर आणि रमजान डोंगरकर (सर्व रा.नवा कर्ला,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात आमान जैनुद्दीन डोंगरकर (21, रा.कर्ला, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानूसार त्याचे वडील जैनुद्दीन डोंगरकर हे पेंशन चालु करण्यासाठी फायनान्स डिपार्टमेंट पेंशन बँ्रच इंपेरिआल चेंबर एस.एस.तोलानी मार्ग बल्लार्ड इस्ट मुंबई प्रोटसच्या ऑफीसमध्ये गेले होते. याचा राग आल्याने आमानच्या तीन काकांनी संगनमताने तुझे बाबा नझीमची पेन्शन कशी चालु करतो ते मी बघतोच असे म्हणत शिवीगाळ करुन त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तेव्हा आमानची बहिण आणि आई तिथे आले असता संशयितांनी त्यांनाही हातांच्या थापटांनी मारहाण केली.