रत्नागिरी:- कर्जाच्या हफ्त्यावरून एकाला तिघांनी मिळून शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना सोमवार 23 मे रोजी रात्री 10.30 वाजता चांदोर ते साखरपा येथे घडली आहे. मित्र इंगुलकर, विवेक पाटील आणि अन्य एकजण अशा तिघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्याविरोधात संजय लक्ष्मण फटकरे (45, रा. चांदोर तलवाड, रत्नागिरी ) यांनी पूर्णगड पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. संजय फटकरे आणि मित्र स्नेहांकीत इंगुलकर याचे वडील भरत बापूराव इंगुलकर या दोघांनी फ्लॅटसाठी बँकेतून कर्ज काढले होते. जो जेवढे कर्ज वापरेल तेवढे त्याने भरायचे असा त्यांच्यात ठराव झालेला होता. परंतु ठराविक कालावधीनंतर भरत बापूराव इंगुलकर यांनी मी आता हफ्ते भरू शकत नाही असे सांगितले. याबाबत त्यांच्यात फोनवर बोलणे झाले होते. दरम्यान, सोमवारी रात्री भरत इंगुलकर यांचा मुलगा मित्र स्नेहांकीत इंगुलकरने संजय फटकरे यांच्या घरी येऊन तुमच्याशी बोलायचे असून गाडीत बसा असे सांगितले. गाडी चांदोर फाटा येथे थांबवून संशयित स्नेहांकीत इंगुलीकर, विवेक पाटील आणि एक जण रा. पुणे यांनी फटकरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. अधिक तपास पूर्णगड पोलीस करत आहेत.









