खेड:-सुलभ व फटाफट कर्ज देणार्या जाहिरातीच्या विळख्यात खेडमधील तरुण फसला आहे. सोशल मिडियावर फिरणाऱ्या एका जाहिरातीला भुलून खेडमधील एका तरुणाने लाखापर्यंत कर्ज देणार्या कंपनीला आपला फोटो व आधारकार्डची प्रत देवून कर्ज घेतले होते मात्र त्या तरुणाच्या फोटोला छेडछाड करत अश्लील फोटो तयार केला. हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देत त्याच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली.
या तरुणाने ब्लॅकमेल करणार्यांविरोधात खेड पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. खेडमध्ये अनेक तरुणांचे अश्लील फोटो अज्ञात लोकांनी तयार करुन ब्लॅकमेल करत आहेत. खेडमध्ये अशाच आणखी एका महिलेला कर्ज फेडल्यानंतरही ब्लॅकमेल करत फायनान्सवाल्यांनी लाखो रुपये उकळले आहेत. अशी चर्चा सुध्दा सुरु आहे.
फसवणूक टाळण्यासाठी येथे संपर्क साधा
ऑनलाईन कर्ज देण्याच्या बहाण्याने तरुणांना ब्लॅकमेल केले जात असेल तर तरुणांनी घाबरुन न जाता पोलीस स्थानकात सायबर सेल 8830404650 या व्हॉटसअॅप नंबरवर तक्रार द्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी केले आहे.