रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे येथील महिलेने विहिरीत झोकून देऊन आत्महत्या केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दर्शना दिनेश शितप (३८, करबुडे, रत्नागिरी) असे महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २८) पहाटेच्या सुमारास घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दर्शना हिने कोणत्यातरी अज्ञात कारणातून घराच्या शेजारी असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी घरातील नातेवाईकांनी तिची शोधाशोध केली असता तिचा मृतदेह शेजारच्या विहिरीत आढळला. या प्रकरणी सकाळी साडेसहाच्या सुमारास ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.