संचालक मंडळातील ९ जणांविरुद्ध गुन्हा ; १० लाख ८७ हजार ७१८ रुपयांची फसवणूक
राजापूर:- करक पांगरी खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील संचालक मंडळातील लोकांनी १० लाख ८७ हजार ७१८ रुपये ६२ पैशांचा गैरव्यवहार केला. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१५ जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत संचालक व अध्यक्ष सुरेश शांताराम बावकर (वय ६०), संचालक सुभाष भिकाजी जाधव (४५), विलास रधुनाथ सरफरे (४२), विश्वास पिलाजी जाधाव (५९), जयराम तुकाराम तावडे (६०), भारती विश्वनाथ वरेकर (४५), अमर नारायण जाधव (४८), तर १० नोव्हेंबर २०१८ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत संचालक भामिनी भास्कर सुतरा (५०) व १० नोव्हेबर ते ३१ मार्च २०२० ) या कालवधीत प्रशांत हरिश्चंद्र सुतार (वय ३८, सर्व रा. करक पांगरी ता. राजापूर) अशी संस्थेत गैरव्यवहार करणाऱ्या संशयितांची नावे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी बाबासाहेब किसनराव गिते (वय ५०, रा. देसाई एलाईट सगकारी गृहनिर्माण संस्था, नारायण तलाव शेजारी चिपळूण) हे करक पांगरी खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत फेर लेखापरिक्षणात संचालक मंडळातील लोकांनी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२९ अंतर्गत शासकीय निधीचा गैरवापर व कर्जदार यांना चुकीच्या पद्धतीने लाभ देवून १० लाख ८७ हजार ७१८ रुपये ६३ पैशांच्या शासकीय निधीचा गैरवापर केला. शासनाची व संस्थेची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी बाबासाहेब गीते यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संचालक मंडळातील नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.