कचरा टाकण्याच्या वादातून चौघांची एकाला जबर मारहाण 

रत्नागिरी:- कचरा साफ केल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा कचरा टाकला याची विचारणा केली असता शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परसप्पा मुलीमनी, अळप्पा मुलीमनी (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) आणि एक महिला व मरव्या अळप्पा मुलीमनी अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. २३) सकाळी सात वाजता क्रांतीनगर झोपडपट्टी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी परशुराम वल्लाप्पा मुलीमनी (वय ४१) यांच्या पत्नीने नेहमी प्रमाणे परिसराचा कचरा साफ करत असताना फिर्यादी यांचे बाजूला असलेल्या झोपडीतील संशयित एका महिलेने साफसफाई केलल्या ठिकाणी कचरा आणून टाकला. त्यावेळी फिर्यादी यांच्या पत्नीने कचरा का टाकतेस असे विचारले असता संशयित महिलने फिर्यादी यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. त्या आवाजाने फिर्यादी यांची मुलगी व मेव्हणा शांताप्पा बाहेर आले. त्यावेळी संशयितांनी फिर्यादी यांच्या पत्नीला मारहाण केले. तसेच संशयित परसप्पा यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करुन दुखापत केली. या प्रकरणी परशुराम मुलीमनी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.