राजापूर:- तालुक्यातील ओणी येथील एन.एस. नायक अँड सन्स या बांधकाम कंपनीच्या हॉटमिक्स प्लँटमधून अज्ञात चोरट्याने १९ हजार रुपये किंमतीच्या सात मोटारी चोरून नेल्या. ही घटना दि. ०९ मे २०२५ रोजी सकाळी ३.०० वा. ते सायंकाळी ७.०० वा. च्या दरम्यान घडली. या चोरीची तक्रार १४ मे रोजी राजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत फिर्यादी फारुक मुनिर मुजावर (वय २७ वर्षे, रा. राजापूर पेट्रोलपंप पुनर्वसाहत) यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, हॉटमिक्स प्लँटसाठी वापरण्यात येणाऱ्या २५ मोटारींपैकी सात मोटारी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या परवानगीशिवाय चोरून नेल्या. राजापूर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.