रत्नागिरी:- जिल्ह्यात शुक्रवारपासून एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून रत्नागिरी शहर बस सेवाही अखेर सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती रत्नागिरी विभागाने दिली.मात्र प्रवास करताना हॅन्ड सॅनिटायझर आणि मास्क हे दोन विषय अत्यावश्यक राहणार आहेत.
गेले काही दिवस शहर बस सेवा सुरू होणार असल्याची चर्चा होती, अखेर सोमवारी 21 पासून ही सेवा सुरळीत करण्याचा निर्णय महामंडळाच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शहर बससेवेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून याची अंमलबजावणी सोमवार पासून केली जाईल. मात्र या बसेस टप्याटप्याने सोडल्या जातील पूर्वी 50 गाड्या दररोज सोडल्या जात होत्या आता इतक्या गाड्या सोडण्यात येणार नाही मात्र काही फेऱ्या प्रवासाच्या प्रतिसाद नंतर सोडल्या जाणार आहे.









