चिपळूण:-अलोरे भोपाळ कॉलनी येथे एस. टी. व दुचाकीचा आज सकाळी 9.30 च्या दरम्यान भीषण अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार आहे.
दुचाकीस्वार प्रल्हाद पवार यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दोन लहान मुले गंभीररित्या जखमी झाली असून या दोन लहान जखमी मुलांना अधिक उपचारासाठी चिपळूणला रुग्णालयात हलवण्यात आले आहे.