रत्नागिरी:- एसटीच्या वाहकाने सुट्या पैशावरुन वृद्ध प्रवाशाला मारहाण केली. दुखापतग्रस्त वृद्धाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेश गोपाळ गुरव (वय ६७, रा. खेडशी, रत्नागिरी) असे दुखापतग्रस्त वृद्ध प्रवाशाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ६) दुपारी एकच्या सुमारास नाखरे ते पावस एसटी बसमध्ये घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध सुरेश गुरव हे नाखरे ते पावस गाडीने रत्नागिरीकडे येत असताना त्यांच्याकडे तिकीटाचे सुटे पैसे नव्हते या बाबत एसटी वाहक याच्यात बाचाबाची झाली. वाहकांने वृद्ध प्रवाशाला ढकला बुकल केली. वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद केली असून रहाटाघर बस स्थानकात अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.