Wednesday, August 12, 2026
spot_img
Home गुहागर एसटी अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी चालकाची निर्दोष मुक्तता

एसटी अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी चालकाची निर्दोष मुक्तता

गुहागर:- तालुक्यातील वेलदूर नवानगर येथे एसटी बसच्या अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी दाखल गुन्ह्यातून आरोपी चालक चंद्रकांत लक्ष्मण सकपाळ (चिखली, कडमवाडी, गुहागर) यांची गुहागर एक न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

तालुक्यातील वेलदूर नवानगर येथे २ फेब्रुवारी २०२३ रोजी एसटी वळवत असताना गाडीखाली येऊन महिलेचा मृत्यू झाला होता. या अपघातप्रकरणी चालक चंद्रकांत सकपाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने उपलब्ध संपूर्ण अभिलेख, साक्षीदारांचे जबाब आणि दोन्ही पक्षांचे युक्तीवाद, अभियोजन पक्षाने अनेक साक्षीदार तपासले तरी आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसा व विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. चालक सकपाळ यांच्यातर्फे ॲड. संकेत साळवी यांनी मुद्दे मांडले. न्यायालयाने या सर्व बाबींचा विचार करून अभियोजन पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद केले. यामध्ये ॲड. अलंकार विखारे, ॲड. सुप्रिया वाघधरे, ॲड. रोशनी पवार, ॲड. मानसी सोमण यांनी सहकार्य केले.