एर्नाकुलम एक्सप्रेसमधून मोबाईल हँडसेट चोरीला

खेड:- २१ जून रोजी रात्री १०:०० ते २२ जून रोजी पहाटे ०६ वाजण्याच्या सुमारास एर्नाकुलम एक्सप्रेसने हजरत निजामुद्दीनपासून मडगाव जंक्शन असा प्रवास करत असताना, खेड रेल्वे स्टेशनजवळ धावत्या ट्रेनमधून अज्ञात चोरट्याने तक्रारदाराचा मोबाईल हँडसेट चोरला.

फिर्यादी उदय दिपक कुमार (वय १८), मूळ रा. हाऊस २४४, निवाडी रोड, उत्तरप्रदेश, फत्तेगड साहिब यांचा ७,०००/- रुपये किमतीचा गडद निळ्या रंगाचा रियलमी कंपनीचा सी-५५ मॉडेलचा मोबाईल हँडसेट झोपेचा फायदा घेऊन चोरण्यात आला. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (क) नुसार गु.र.नं. २१८/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ०६ जुलै २०२५ रोजी दुपारी ०४:२१ वाजता दाखल करण्यात आला.