एमआयडीसी येथे मारहाण प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील एमआयडीसी-मिरजोळे येथे फोन करुन शिवीगाळ व दुखापत करुन ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोटया नाचणकर (रा. साईभूमीनगर, नाचणकर चाळ, रत्नागिरी) व अन्य दोन व्यक्ती अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. ३) सायंकाळी चारच्या सुमारास हॉटेल ओमसाई , एमआयडीसी मिरजोळे. येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रुपनारायण हनुमानसहाय यादव (रा. जांभुळफाटा, मजगाव रोड, रत्नागिरी) हे मंगळवारी चारच्या सुमारास ओमसाई हॉटेलच्या बाहेर असताना संशयित गोट्या नाचणकर यांनी फोन केला. त्यांच्या सोबत अन्य दोन व्यक्ती होत्या. त्यांनी फिर्यादी रुपनारायण यादव हाताच्या थापटाने मारहाण करुन संशयित गोट्या नाचणकर यांनी हातातील कडा फिर्यादी यांच्या डोक्यात लागून दुखापत झाली. तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रुपनारायण यादव यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.