एमआयडीसी येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- शहरातील एमआयडीसी अंतर्गत रस्त्यावर टीआरपी एसटी बसस्टॉप एका काजूच्या झाडासमोर अवैद्य मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ८४० रुपयांची मुद्देमाल जप्त केला. संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेंद्र रामचंद्र पांचाळ (वय ५३, रा. कोकणनगर, शिरगाव रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २६) दुपारी सव्वाच्या सुमारास एमआयडीसी येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित अवैद्य मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम घेतलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी योगिता नाटुस्कर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.