एमआयडीसी येथे घरातील दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्याने लांबवली

रत्नागिरी:- शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथील भक्तिपुंज रहिवासी संकूलात राहणाऱया महिलेचे दागिने व रोख रक्कम घरातून चोरट्याने चोरुन नेल़े सोनल संतोष शितप (40, ऱा मिरजोळे एमआयडीसी) असे तकार दाखल करणाऱया महिलेचे नाव आह़े यापकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2024 या कालावधीत चोरट्याने सोनल शितप यांच्या मिरजोळे एमआयडीसी भक्तीपुंज संकुलातील घरातील दागिने अज्ञाताने चोरुन नेल़े यामध्ये 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, कानातले सोन्याची चेन व रोख रक्कम 14 हजार रुपयांचा समावेश आह़े यापकरणी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 305 (अ) नुसार गुन्हा दाखल केल़ा