Thursday, August 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी एफडीए कारवाईने रंग उडाला, पिवळाधम्मक गूळ गेला कुठे ?

एफडीए कारवाईने रंग उडाला, पिवळाधम्मक गूळ गेला कुठे ?

बाजारपेठेतून पिवळा गुळ गायब

रत्नागिरी:- गुळाला आकर्षक रंग येण्यासाठी काही उत्पादक रासायनिक पदार्थाचा वापर करत असल्याचे अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईमध्ये निदर्शनास आले आहे. मात्र, कारवाईमुळे व्यावसायिक सजग झाले असून, विक्री करताना दक्षता घेत आहेत. त्यामुळे केशरी, पिवळागर्द मिळणाऱ्या गुळाऐवजी रंगहीन गूळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

साखरेला पर्याय म्हणून गुळाचा वापर केला. गुळामध्ये असलेल्या अंतर्गत पोषक गुणधर्मामुळे गुळासाठी मागणी वाढू लागली आहे. बाजारात पूर्वी केशरी, पिवळा गूळ उपलब्ध होत होता. परंतु, कारवाईवेळी रासायनिक घटक सापडल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता असल्यामुळे आता रसायनविरहित गुळाची विक्री केली जात आहे. ग्राहकांकडूनही सेंद्रिय गुळासाठी वाढती मागणी होत आहे. गोड पदार्थ करताना खास रंग येण्यासाठी वापरला जाणारा केशरी, पिवळ्या रंगाचा गूळ बाजारातून गायब झाला आहे.

गूळ तयार करत असताना वजन, रंग आणि चकाकी वाढवण्यासाठी साखर व धुण्याचा सोडा यांची प्रामुख्याने भेसळ केली जाते. उजळ रंग दिसण्यासाठी सोडियम हायड्रोसल्फाईट, रंग कायम राहावा यासाठी सल्फरडाय ऑक्साईड, कृत्रिम रंगाचा वापर केला जातो. भेसळयुक्त गुळाच्या सेवनामुळे पचनाची समस्या उद्भवू शकते. विषबाधा, इतर आजाराचा धोका असल्यामुळे गुळाची शुद्धता तपासणे महत्त्वपूर्ण आहे.