एकता मार्ग येथील मटका जुगारावर कारवाई

रत्नागिरी:- शहरातील एकता मार्ग रस्त्यावर बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ४४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप वसंत धनावडे (वय ५४, रा. आनंदनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २५) सायंकाळी सातच्या सुमारास एकता मार्ग रस्त्यावर एका घराच्या समोर बंद टपरीच्या आडोशाला निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना मटका जुगार चालवत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी कारवाई करुन मटका जुगाराच्या साहित्यास ४४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.