‘उपर’च्या वाऱ्यांमुळे मत्स्य हंगामासाठी पर्वणी 

रत्नागिरी:-  समुद्रात जोरदार वाहणारे ‘उपर’चे ( उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारे ) वारे सध्याच्या मत्स्य हंगामासाठी पर्वणी ठरत आहेत. हंगामाच्या प्रारंभीच मच्छीमारांच्या जाळ्यात पापलेट, सुरमई, कोलंबी, बांगडा, सरंगा आदी चविष्ट मासे सापडत असल्यामुळे यंदाचा मासेमारी हंगाम जोर धरू लागला आहे.

रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर गिलनेट , न्हय , रापण , घरकडी ट्रॉलिंग , फिशिंग अशा विविध प्रकारची मासेमारी करण्यात येते . पावसाळ्यानंतर काही दिवस समुद्रातील बदलत्या वातावरणामुळे मासेमारी हंगाम थंडावला होता . यावेळी मच्छीमारही चिंतेत होते . मात्र , आता मच्छीमारांच्या जाळयात बऱ्यापैकी मासळी मिळत असल्याने मच्छीमार सुखावला आहे . सद्यस्थितीत गिलनेटधारक मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात बांगडा मासा मिळत आहे . पारंपरिक मच्छीमारांकडून आलेल्या बांगड्याला सुरुवातीला टोपलीमागे ६०० रुपये दर प्राप्त झाला होता . मात्र जसजशी बांगड्याची आवक वाढत गेली तसा बांगड्याचा दर घसल्याची स्थिती होती . पापलेटला लहान मोठ्या आकारानुसार दर मिळत होता . बारीक पापलेटच्या टोपली मागे २०२१ ते २५०० इतका दर होता . तर मोठ्या पापलेटला टोपलीमागे ३००० ते ३५०० रुपये दर मिळाला छोटी सनाकी प्रति टोपली १२०० रुपयांना खरेदी केली गेली .

मोरीचा दर प्रतिकिलो २८० ते २ ९ ० एवढा होत पांढऱ्या कोलंबीचा भाव प्रति किलो ३०० रुपये होता यंदा देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वच राज्याम बांगड्याचे उत्पादन होत आहे . बांगड्याची मोठ्या आवक होत आहे . दोन दिवसांपूर्वी मालवणात स्था मच्छीमारांना बंपर बांगडा मासा आढळून आला होता. बांगड्याला भाव कमी मिळाल्याने मच्छीमार नाराज होते . मात्र , मासळी खारविणे व सुकविणाऱ्या व्याप उत्तम प्रतिसाद दिल्याने मच्छीमारांच्या श्रमाला थोडे यश मिळाले . मालवण बंदरात आता चांगल्या प्रकारे उपलब्ध होत असल्याने मत्स्यखवय्ये देखील सुखावले आहेत .

जोर धरू लागला आहे . रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर गिलनेट , न्हय , रापण , घरकडी ट्रॉलिंग , फिशिंग अशा विविध प्रकारची मासेमारी करण्यात येते . पावसाळ्यानंतर काही दिवस समुद्रातील बदलत्या वातावरणामुळे मासेमारी हंगाम थंडावला होता . यावेळी मच्छीमारही चिंतेत होते . मात्र , आता मच्छीमारांच्या जाळयात बऱ्यापैकी मासळी मिळत असल्याने मच्छीमार सुखावला आहे . सद्यस्थितीत गिलनेटधारक मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात बांगडा मासा मिळत आहे . पारंपरिक मच्छीमारांकडून आलेल्या बांगड्याला सुरुवातीला टोपलीमागे ६०० रुपये दर प्राप्त झाला होता . मात्र जसजशी बांगड्याची आवक वाढत गेली तसा बांगड्याचा दर घसल्याची स्थिती होती . पापलेटला लहान मोठ्या आकारानुसार दर मिळत होता . बारीक पापलेटच्या टोपली मागे २०२१ ते २५०० इतका दर होता . तर मोठ्या पापलेटला टोपलीमागे ३००० ते ३५०० रुपये दर मिळाला . छोटी सनाकी प्रति टोपली १२०० रुपयांना खरेदी केली गेली.

मोरीचा दर प्रतिकिलो २८० ते २९० एवढा होता . पांढऱ्या कोलंबीचा भाव प्रति किलो ३०० रुपये होता . यंदा देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वच राज्यामध्ये बांगड्याचे उत्पादन होत आहे . बांगड्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे . दोन दिवसांपूर्वी मालवणात स्थानिक मच्छीमारांना बंपर बांगडा मासा आढळून आला होता . बांगड्याला भाव कमी मिळाल्याने मच्छीमार नाराज झाले होते . मात्र , मासळी खारविणे व सुकविणाऱ्या व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने मच्छीमारांच्या श्रमाला थोडेफार यश मिळाले . मालवण बंदरात आता चांगल्या प्रकारे मासे उपलब्ध होत असल्याने मत्स्यखवय्ये देखील सुखावले आहेत.