रत्नागिरी:- तालुक्यातील बोंडये येथे दवाखान्यात गेलेल्या महिलेचे बंद घर चोरट्यांनी घरफोडी करुन ३ लाख सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. २८) दुपारी साडेबारा ते साडेतीनच्या सुमारास तालुक्यातील बोंड्ये-कुणबीवाडी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सौ. शुभांगी शिवाजी भोसले (वय ५७, रा. बोड्ये-कुणबीवाडी, रत्नागिरी) या शनिवारी गावातील डॉ. वाणी यांच्याकडे उपचारासाठी गेल्या होत्या या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घराच्या बेडरुमध्ये असलेल्या लोखंडी कपाटाच्या ड्राव्हरला कपाटाला अडकवलेली चावीन ड्राव्हर उघडून त्यातील एक काळ्या मण्याचे व मध्ये-मध्ये डिझाईनच्या सोन्याच्या पट्या असलेली व मध्यभागी गोलसर सोन्याचे पेंडल असलेली ७ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, २० हजाराची चपटी गोलट कानातील सोन्याची कुडी, अर्धा तोळा वजनाच्या किमती वस्तू असा सुमारे ३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने पळविला. या प्रकरणी सौ. शुभांगी भोसले यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.