रत्नागिरी:-शहरातील उद्यमनगर येथील घराचे कुलूप तोडून कपाटामधील पर्समधून रोख 4 हजार रुपये लांबवले.ही घटना 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वा.कालावधीत घडली आहे.याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
अशोक सिध्दनाथ चौधरी (28, रा.उद्यमनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात वैदही अनिल घडशी (37,रा.पडवेकर कॉलनी उद्यमनगर,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,15 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधीत त्यांच्या घराचे कुलुप तोडून संशयिताने कपाटातील गुलाबी रंगाच्या पर्समधील रोख 4 हजार रुपये लांबवले होते.याप्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक बर्गे करत आहेत.