उद्यमनगर येथे घरातून मोबाईल, रोख रक्कम लांबवली

रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर पटवर्धनवाडी येथील गौरव अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमधून मोबाईल व रोख रक्कम लांबवल्याची घटना 6 फेब्रुवारी रोजी 6.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद आदित्य गुळेकर (22, उद्यमनगर, पटवर्धनवाडी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.