उद्यमनगर येथे खंडणीसाठी धमकवणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरानजीकच्या मजगाव रोड येथे तरुणाच्या खिशातील 500 रुपये जबरदस्तीने काढून घेत तुझ्या मालकाला सांग आम्हांला 50 हजार रुपये दे नाहीतर त्याचे हातपाय तोडून टाकीन अशी धमकी दिली. ही घटना बुधवार 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वा.सुमारास घडली असून याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लुबनान उर्फ कासिम साब तहसिलदार आणि सुबहान कासिम खले (दोन्ही रा.कोकणनगर,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे.त्यांच्याविरोधात सोनुकुमार गुड्डूकुमार गौतम (19,सध्या रा.थिबा पॅलेस रोड मुळ रा.उत्तरप्रदेश) याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानुसार,बुधवारी दुपारी या दोन संशयितांनी मजगाव रोड येथे  त्याच्या खिशातील 500 रुपये जबरदस्तीने काढून घेत तुझ्या मालकाला सांग आम्हांला 50 हजार रुपये दे नाहीतर त्याचे हातपाय तोडून टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.