रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर येथील राजापूरकर कॉलनीत 15 हजार 670 रुपये किंमतीचे 78 किलो गोवंशिय मांस विक्रीसाठी घरात बाळगणार्या दांम्त्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून दोन ते तिन दिवसांपूर्वी करण्यात आली असून संशयितांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.
रुहिना अशपाक घासवाला (33) तिचा दुसरा पती रिझवान युनिस कापडे (दोन्ही रा.माशाअल्ला बिल्डिंग उद्यमनगर पडवेकर कॉलनी,रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत.याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गोपनीय माहिती मिळाल्यानुसार ते आपल्या कर्मचार्यांसह संशयितांच्या घरी धाड टाकली.त्यावेळी किचनजवळील डिपफ्रिजरमध्ये बर्फामध्ये कोणत्यातरी प्राण्याचे पायाच्या खुरांसह उग्र वासाचे मांस दिसून आले.त्या मांसाची खात्री करण्यासाठी पोलिसांनी पशुवैद्यकिय अधिकार्यांना बोलावून त्याची प्राथमिक तपासणी केली असता ते मांस गाय/बैल अथवा म्हैस वर्गापैकी प्राण्याचे असल्याबाबत त्यांनी माहिती दिली.संशयित महिला रुहिनाकडे मांसाबाबत चौकशी केली असता तिचा दुसरा पती रिझवान कापडे सध्या कामानिमित्त सांगलीला गेला असून तो हे मांस घरात आणून ठेवल्याचे तिने सांगितले.
तसेच हे मांस ती महिला 200 रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री करुन त्याचा मोबदला रोख अथवा तिच्या मोबाईल जिपेव्दो ऑनलाईत स्विकारत असल्याचे तिने सांगितले.या मांसाची ने आण करण्यासाठी तिचा पती दोन कारचा वापर करत असल्याची माहितीही तिने पोलिसांना दिली.दरम्यान, डिपफ्रिजरमधील मांसाचे वजन केले असता ते 78 किलो 350 ग्रॅम भरले.या गुन्ह्यातील मांस,त्यासाठी वापरण्यात आलेला डिपफ्रिजर,इलेक्ट्रिक वजन काटा,एक सुरा,लाकडी ठोकळा असा एकूण 33 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागने जप्त केला.या दोन्ही संशयितां विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 2015 चे कलम 5 (ब),(क),9 (अ) भादंवि 429,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.