उद्यमनगर महिला रुग्णालय परिसरात आढळले 2 मृत कावळे

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात अचानक मृत पक्षी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी शहरातील उद्यमनगर येथील महिला रुग्णालय येथे 2 कावळे मृत अवस्थेत आढळून आले आहेत. आरोग्य यंत्रणेकडून तत्परतेने मृत कावळ्यांना शासकीय निर्देशानुसार पुरण्यात आले.
 

काही दिवसांपूर्वी शहरातील आठवडा बाजार येथे तर पांढरा समुद्र येथे तसेच मच्छीमार्केट परिसरात देखील मृत पक्षी आढळून आले होते. बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सर्व खबरदारी घेतली.  आता उद्यमनगर येथे कावळे मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.कोरोना पाठोपाठ बर्ड फ्ल्यूचे नवे संकट घोंगावत आहे. दापोली इथे देखील अशाच पद्धतीने कावळे सापडल्यावर खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर येथील आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली असून डाॅ. अभिजीत कसाळकर, रविंद्र केसरकर यांच्यासह टीमने तत्परता दाखवत शासकीय निर्देशानुसार मृत कावळ्यांना त्याच परिसरात पुरण्यात आले.