रत्नागिरी:- तालुक्यातील उक्षी-सावंतवाडी येथे घरासमोर रस्त्याच्या बाजूला पार्किंग करुन ठेवलेल्या दुचाकीवर जाणीवपुर्वक पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. १४) रात्री साडेअकराच्या सुमारास उक्षी-सावंतवाडी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शिवम शशिकांत केळकर (रा. उक्षी, रत्नागिरी) यांनी मंगळवारी रात्री त्यांच्या घराच्या समोरील रस्त्यावर दुचाकी (क्र. एमएच-०८ एवाय ७४०१) पार्क केली होती. या दुचाकीवर अज्ञाताने पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दुचाकीचे पुढील हेडलाईट, मडगार्ड, वायरिंग जळून सुमारे ३० हजाराचे नुकसान झाले. या प्रकरणी शिवम केळकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.