रत्नागिरी:- सोशल मिडियाच्या इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुलांचे अश्लील व्हिडिओ टाकणाऱ्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित मोहन वाभिटकर असे ई-मेल आयडी मोबाईल धारकाचे नाव आहे. ही घटना २३ जून २०२२ या कालवधीत घडली. गुरुवारी (ता. २८) संशयितावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वाभिटकर याने मोबाईलवरुन इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर अल्वयीन मुलांचे ३.१६ एम. बी क्षमतेचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.