रत्नागिरी:- रिफायनरी समर्थन केले म्हणून आमदार राजन साळवी यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांविरोधात राजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे.
मनाई आदेश जारी असताना आमदार डॉ. राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केल्याने त्यांच्या पुतळ्याला चपलांचे हार घालून , चपलांचा थोबाडावर मार देऊन, शेण फासून व त्यांच्या नावाच्या घोषणा बारसु – सोलगाव पंचक्रोशीतील शिवणे खु., गोवळ येथील ग्रामस्थांनी दि २३ नोव्हेंबर २०२२ रोजी निषेध केल्याने गोवळ खालचीवाडी येथील सुमारे 70 ते 80 महिला व सुमारे 30 ते 35 पुरुष तसेच शिवणे खुर्द होळीचा मांड येथील सुमारे 30 ते 35 महिला व सुमारे 20 ते 25 पुरुष यांचे विरुद्ध राजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे.अधिक तपास महिला पोलीस हवालदार हर्षदा चव्हाण या करीत आहेत.