उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णावर हल्ला
रत्नागिरी:- आर्थिक देवाणघेवाणीतून तुंबळ हाणामारी होऊन जिल्हा रुग्णालयात मध्ये उपचार घेण्यासठी दाखल झालेल्या तरुणावर जिल्हा रुग्णालयात पुन्हा हल्ला झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घुडेवठार व जिल्हा शासकीय रुग्णालय येथे घडली. या हल्यात एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत.
घुडेवठार येथे राहणाऱ्या तरुणाकडून त्याच परिसरात भाड्याने राहणाऱ्या एका तरुणाने हात उसने पैसे घेतले होते. ते पैसे मागण्यासाठी तो तरुण गेला असता दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली. याच धरत पैसे घेतलेल्या तरुणाने आपल्या मित्राला त्याठिकाणी बोलावून घेतले आणि नव्या वादाला तोंड फुटले. माझ्या मित्राला मारतोस काय अशी विचारणा करत रात्रीच्यावेळी फिल्मीस्टाईल हाणामारी सुरु झाली. हा प्रकार इथवर न थांबता जखमी झालेल्या अक्षय प्रकाश नाखरेकर (३१रा.गुढेवठार) याला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानतर अपघात विभागत त्याचवर पुन्हा हल्ला करण्यात आला.
याबाबत अक्षय याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अमेय मसुरकर, आशिष सावंत, सुमित शिवलकर, हर्षद धूळप, अभिषेक पांचाळ असे अपघात विभागात आले. बेडवर उपचार घेणाऱ्या अक्षय याचेवर आशिष सावंत यांनी त्याचे उजवे हातातील लोखंडी फाईट डोक्यावर मारली. तसेच सुमित शिवलकर यांनी ट्रे ने तसेच लोखंडी टेबलने त्याच्या डोक्यावर मारहाण करून दुखापती केल्या.
भर हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला.यावेळी डॉक्टर आणि नर्स यांची धावाधाव सुरु झाली होती. याचवेळी अक्षय नाखरेकर या जखमी तरुणाला बेडवरून खाली पाडले व त्याचे भावजी अमोघ पालकर यास अमेय मसूरकर व हर्षद चूळप हे हॉस्पिटल मधील लाकडी टेबल, प्रेशर चेक करायचे मशीन ने मारहाण केली. हा प्रकार घडला त्यावेळी अपघात विभागात डॉक्टर व नर्स असा स्टाफ हजर होता.
या प्रकरणी अक्षय प्रकाश नाखरेकर याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हर्षद धूळप, अभिषेक पांचाळ, सुमित शिवलकर, आशिष सावंत, अमेय मसुरकर, व इतर पाच ते सहा जण यांनी घुडेवठार ते सिव्हील हॉस्पिटल दरम्याने लाकडीदांडे, लोखंडी रॉड, लोखंडी फाईट, लोखंडी व लाकडी टेबल ट्रे, प्रेशर मशीन दगड यांचा वापर करून मारहाण केल्याने भा.द.वि.क.१४३,१४७,१४८,१४९,३२४,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.