रत्नागिरी:- रत्नागिरी : राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या गाडीला दुचाकीस्वाराची धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण जखमी झाला आहे. भाट्ये येथे झरी विनायक मंदिरासमोर आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
मिर बानी (वय-२१, राजापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. जखमीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, बानी हा राजापुरहून रत्नागिरीच्या दिशेने बहिणीला घेऊन निघाला होता. तो गोगटे कॉलेजला येत होता. भाट्ये येथील झरी विनायक मंदिरासमोर त्याच्या दुचाकीची आमदार साळवी यांच्या कारला धडक झाली. यात दुचाकीस्वार मिर बानी जखमी झाला. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.









