तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- पायपुसणीची किंमत १०० रुपये सांगितल्याच्या रागातून विक्रेत्याला तिघांनी मारहाण व दुखापत केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रल्हाद शंकर पावसकर (वय ३४), मंदार महादेव वडपकर (वय ३५) व दिनेश जगन्नाथ वरवडकर (तिघेही रा. पावस बाजारपेठ-रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. २८) दुपारी चारच्या सुमारास आठवडा बाजार येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी ब्रिजेश कुमार विश्वनाथ प्रसाद (वय ५०, रा. झारणी रोड, मच्छीमार्केट, रत्नागिरी) हे पायपुसणीची विक्री करत असताना पायपुसणीची किंमत शंभर रुपयाला दोन असे सांगितले. संशयितांनी शंभरला तीन मागितली त्यावर बिजेशकुमार यांनी असे देता येत नाही असे सांगितले यांचा राग मनात धरुन ब्रिजेशकुमार यांना धक्काबुक्की व मारहाण केली तसेच साजिदा पठाण यांच्या स्टॉल मधील लोखंडी स्टूलने ब्रिजेशकुमार यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली. या प्रकरणी ब्रिजेशकुमार प्रसाद यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.