रत्नागिरी:- शहरातील रामनाका ते आठवडाबाजार दरम्यान वृध्दाला दोन तरुणांनी भुरळ पाडून लुटल्याचा प्रकार 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा. च्या सुमारास घडला. याबाबतची फिर्याद नंदकिशोर यशवंत पाडळकर (62, श्रीनगर खेडशी) यांनी शहर पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकिशोर पाडळकर हे 19 सप्टेंबर रोजी रामनाका येथे खरेदीसाठी गेले होते. यावेळी अनोळखी 25 ते 30 वर्षाच्या दोन तरुणांनी त्यांना बोलण्यात गुंतवून भुरळ पाडली. त्यांना आठवडा बाजारपर्यंत नेले. तेथे पाडळकर यांच्या अंगावरील सोन्याची चेन, हाताच्या बोटातील अंगठी असे काढून घेउन 1 लाख 92 हजाराला लुटले आणि फरार झाले. आपली फसवणूक झाल्याचेे लक्षात आल्यानंतर पाडळकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत दोन व्यक्तींचे वर्णन केले आहे. यातील एक व्यक्ती 25 -30 वयातील तरूण रंग सावळा, चेहरा उभट, बांधा, सडपातळ, हिंदी भाषेत बोलणे, अंगात फुल हाताचा राखाडी टी शर्ट, जीन्स, पायात स्लिपर असे एकाचे वर्णन आहे तर दुसरा सुमारे 40 ते 45 वर्षाचा इसम असून रंग सावळा, चेहरा गोल, बांधा मजबूत, अंगात हाफ हाताचा डार्क ब्लु रंगाचा लाईन असलेला शर्ट व निळया रंगाची जिन्स, पायात स्लिपर असे दुसर्याचे वर्णन आहे. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून आठवडाबाजार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.