आठवडाबाजार येथे चाकू हल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील आठवडाबाजार येथे अज्ञात कारणातून चाकूने वार करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वर्तक (वय अंदाजे ४५, पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १७) दुपारी घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिपिन विजय पिलणकर (वय ३६, शि. आत्मबंधू प्लाझा, आठवडा बाजार-रत्नागिरी) यांच्या घराच्या बाजूला उभा राहून संशयित विनाकारण शिवीगाळ करत होता म्हणून फिर्यादी यांनी विचारणा केली. याचा राग मनात धरून संशयिताने ‘हातातील चाकूने फिर्यादीच्या उजव्या ‘हाताच्या मनगटावर मारून दुखापत केली. या प्रकरणी बिपिन पिलणकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.