Friday, October 30, 2026
spot_img
Home रत्नागिरी आजाराला कंटाळून प्रौढची गळफास घेऊन आत्महत्या

आजाराला कंटाळून प्रौढची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील नाचणे येथील विनम्रनगर परिसरातील गणराज रेसिडन्सीमध्ये एका ५४ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मणक्याच्या आजारामुळे त्रस्त असल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब महादेव भागवत (वय ५४, रा. नाचणे विनम्रनगर, ता. जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे.

​दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मयत बाबासाहेब भागवत हे मागील काही काळापासून मणक्याच्या आजाराने त्रस्त होते. या आजाराच्या त्रासाला कंटाळ येऊन त्यांनी राहत्या घराच्या बेडरुममध्ये हा टोकाचा निर्णय घेतला.

​बेडरुममधील बेडवर लाकडी स्टूल ठेवून त्यावर चढून, त्यांनी सिलींग फॅनला स्कार्फच्या एका बाजूने बांधून आणि दुसऱ्या बाजूने मानेला फास अडकवला. त्यानंतर स्टूलवरून उडी मारल्याने गळफास घट्ट बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

​याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक करत आहेत.