रत्नागिरी:-तालुक्यातील साखरतर येथे आईस्क्रिम न दिल्याच्या रागातून तरुणावर धारदार वस्तूने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवार 27 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12.45 वा.सुमारास घडली. या प्रकरणी वार करणाऱ्या एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी नवाब नुरमहम्मद मजगावकर (रा.रहेकर मोहल्ला साखरतर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात सैफ सज्जाक मुकादम (23,रा. अकबर मोहल्ला साखरतर) याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानूसार,सोमवारी रात्री सैफ मुकादमने नवाबला आईस्क्रिम दिले नाही.या रागातून त्याने सैफला शिवीगाळ करत कोणत्यातरी धारदार वस्तूने त्याच्या डाव्या कानाच्या पाठीमागे तसेच डाव्या बाजुच्या कमरेवर व डाव्या हाताच्या बोटावर वार करुन त्याला गंभिर दुखापत केली.तसेच तुला व तुझ्या घरातील माणसांना सोडणार नाही अशी धमकिही दिली होती.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल कदम करत आहेत.