आईसह स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात करत स्वतःच्या तसेच मागे बसलेल्या आपल्या आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक मुलाविरोधात विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताची ही घटना गुरुवार १३ जून रोजी दुपारी १.३० वा. गावडे आंबेरे येथे घडली होती. समीर रघुनाथ गुळेकर (४५, रा. मावळगे, ९ रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालक मृत मुलाचे नाव आहे तर या अपघातात त्याची आई सुनंदा गुळेकर (७०) यांचाही मृत्यू झाला होता.

गुरुवारी दुपारी समीर आपल्या ताब्यातील दुचाकीवरुन आईन सुनंदा हिला घेउन डोर्ले शिवार आंबेरे मार्गे मावळंगे असा येत होता. तो शिवार आंबेरे ते पावस जाणाऱ्या उताराच्या रस्त्यावर आला असता त्याचा दुचाकीवरीला ताबा सुटल्याने हा अपघात झाला होता. यात दोघंही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.