रत्नागिरी:- तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक येथील बागेत आंबे काढत असताना लोखंडी घळाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी 10.30 वा सुमारास घडली. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजेंद्र दिलीप मयेकर (35, रा.पोमेंडी बुद्रुक, रत्नागिरी ) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी सकाळी तो बागेतील आंबे काढत होता. तेव्हा लोखंडी घळाचा झाडाच्या बाजूनेच गेलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून तो झाडावरून खाली पडला. बेशुद्ध अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.