Friday, October 23, 2026
spot_img
Home गुन्हेगारी असगोलीत दोन ठिकाणी घरफोडी; सोन्याचे दागिने लांबवले

असगोलीत दोन ठिकाणी घरफोडी; सोन्याचे दागिने लांबवले

गुहागर:- शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या असगोली गावामध्ये काही अंतरावर भजनाची डबलबारी चालू असताना घरामध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. १८ व १९ ऑक्टोबर रोजी सलग दोन दिवस चोरीच्या घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतेचे वातावरण असून पोलिसांसमोर केंली असून या चोरट्याने पकडण्यात गुहागर पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

असगोली येथे श्री व्याघ्रांबरी मंदिरासमोरील जागेमध्ये श्री नवरात्र उत्सवानिमित्त १८ ऑक्टोबर रोजी भजनाचा डबलबारीचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम रंगलेला असतानाच रात्री याच परिसरातील मनश्री महेश असगोलकर यांच्या घराच्या स्लायडींग खिडकीची जाळी कापून खिडकीतून घरात प्रवेश करून कपाटातील कुलूप फोडून एक ग्रॅम सोन्याचा हार चोरून नेला आहे.

यानंतर १९ ऑक्टोबर रोजी नवरात्र उत्सवामध्ये दांडिया सुरू असताना याच परिसरातील रेवती सुरेश धोपावकर यांच्या घरातील लॉक नसलेल्या कपाटामधून दोन तोळे सोन्याची चेन चोरून नेली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.