अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

दापोली:- अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेऊन अश्लील चाळे केल्याप्रकरणी सुनील यशवंत शिंदे (दापोली) याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्याशी अश्लील चाळे करून त्रास दिल्याप्रकरणी भादवि ३५४,३५४ (ड), ५०६ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार कलम ८, १२ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे हा २० ऑगस्ट २०२३ पासून पीडित मुलीला त्रास देत होता. मुलीचा पाठलाग करणे, मनाला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करणे, झाल्या प्रकाराबद्दल घरी कोणाला सांगितले तर तुला, वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देणे अशा प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली होती. तिने याबाबत घरी कोणाला काहीही सांगितलेले नव्हते. १५ जून नंतर पुन्हा सुनील शिंदे हा दिसल्याने तो परत आपल्याला त्रास देईल या भीतीने पीडित मुलगी आजारी पडली.

तिला दवाखान्यात अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते. ५ दिवसांनी डिस्चार्ज मिळाल्यानंतर जेव्हा घरी आणले तेव्हा तिला विचारणा केली असता २० ऑगस्ट २३ ते जून २४ पर्यंत घडलेला सगळा प्रकार तिने घरच्यांना सांगितला.

त्यानुसार ‘सुनील शिंदे याच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली. या फिर्यादीनुसार शिंदे याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली आहेत. पोलीस करीत