अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी संशयिताला न्यायालयीन कोठडी

चिपळूण:- १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मंदार मंगेश कदम याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवारी ही पोलीस कोठडी संपताच पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मंदार कदमने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एप्रिल ते ऑगस्ट २०२५ दरम्यान तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खळबळजनक घटनेनंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवारी ही पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.