अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता

दापोली:- दापोली तालुक्यातील 14 वर्षीय मुलीवर अत्याचाार केल्याचा आरोप ठेवण्यात असलेल्या संशयिताची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणाी संशयिताविरुद्ध सरकार पक्षाने फोस्को कायदे अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता 376 नुसार गुन्ह्याचे आरोप दाखल केले होते. या कामी संशयितातर्फे अ‍ॅडव्होकेट सुधीर शरद बुटाला यांनी काम पाहिले.

सरकार पक्षातर्फे एकूण 26 साक्षीदार तपासण्यात आले. या सर्वांचे उलट तपास अ‍ॅडवोकेट सुधीर शरद बुटाला यांनी घेतले. साक्षीदारांच्या उलट तपासात अ‍ॅडवोकेट बुटाला यांनी फिर्यादीला जे प्रश्न विचारले त्याद्वारा असे दिसून आले की अत्याचार झाला होता तर ती ओरडून देखील आजूबाजूची लोकं का आली नाहीत. इतकेच नव्हे तर तिने हा प्रसंग आईला का सांगितला नाही व ती दुसर्‍या दिवशी शाळेत कशी काय गेली अशा परिस्थितीत अनेक विविध प्रश्न अ‍ॅडवोकेट बुटाला यांनी सादर केले. एकंदर झालेला युक्तिवाद व आलेला पुरावा लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश खेड यांनी सशयिताची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.