Friday, June 5, 2026
spot_img
Home गुन्हेगारी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकास अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकास अटक

राजापूर:- तालुक्यात १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून मित्राच्या खोलीवर नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलीपकुमार संदीप बावकर (१९) याच्या विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी पीडितेच्या आईने राजापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. ३ एप्रिल रोजी हा प्रकार घडला. पीडित तरुणी संगणक प्रशिक्षणासाठी येत होती. यातून तिची व आरोपीची ओळख झाली होती. एकमेकांच्या मोबाईवर त्यांचे चॅटिंगही सुरू होते. यातूनच ३ एप्रिल रोजी आरोपीने राजापुरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी राजापूर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील अधिक तपास करत आहेत.