अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

चिपळुणात पोस्को अंतर्गत गुन्हा

चिपळूण:- अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार मंगेश कदम असे संशयिताचे नाव आहे. त्याने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून, धमकी देऊन जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेऊन गर्भवती केले. पीडित मुलीने चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे चिपळूण मधील भाजप पक्षाचा पदाधिकारी मंदार मंगेश कदम ( कापसाळ) याने एप्रिल 2025 ते ऑगस्ट 2025 दरम्यान एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केले. याबाबत पीडित बालिकेने चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर संशयित आरोपी मंदार कदम हिला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले.

मंदार कदम हा सदरच्या प्रकरणात चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याच्या मोबाईलमधील अनेक किस्से समोर आल्याचे समजते तसेच गांजा पटू असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे भाजपचा पदाधिकारी मंदार कदम यांचे अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत.