लांजा:- शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात गाठून विनयभंग करणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला लांजा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, बुधवारी नववीमध्ये शिकणारी मुलगी शाळेत जात असताना सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शिपोशी येथील अरुण दत्ताराम सुतार याने तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर हा तरुण तेथून पळून गेला. पीडित मुलीने घरी जाऊन हा प्रकार आईवडिलांना सांगितला. त्यानंतर बुधवारी रात्री मुलीच्या तालुका विधि समितीच्या सदस्य स्वप्ना सावंत यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेली. त्यानंतर याप्रकरणी लांजा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी संशयित अरुण सुतार याला अटक केली आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्वेता पाटील करीत आहेत.