अल्पवयीन मुलीची बदनामी प्रकरणी तरुण अटकेत

दापोली:- शहरातील एका अल्पवयीन मुलीने प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच लग्न करण्यास नकार दिल्याने समाज माध्यमावर या मुलीसंदर्भात अश्लील मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी आनिकेत ढेपे-पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

 दापोली पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार 2 जानेवारी ते 10 एप्रिल या कालावधीत आनिकेत ढेपे-पाटील (24) याने 17 वर्षे वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीला आपल्याशी प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच लग्न करण्यास सांगितले. मात्र या मुलीने त्यास नकार दिल्याने आजनकेत याने समाजमाध्यमावर या मुलीचा फोटो टाकून अश्लील मजकूर पोस्ट केला. 

 यामुळे बदनामी झालेल्या या मुलीने अखेर दापोली पोलीस ठाण्यात आनिकेत ढेपे-पाटील याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार दापोली पोलीस ठाण्यात आनिकेत याच्यााजवरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.