अमली पदार्थ विक्री प्रकरणात संशयित आरोपीला अटक

रत्नागिरी:- शहरातील गोखलेनाका ते सावरकर चौक रस्त्यावरील पालिकेच्या पार्किंग जवळ अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या संशयित पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १० हजार रुपये किमंतीचा अमली पदार्थ जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंकदर जलिल शहा (वय ४५) रा. लिमये कंपाऊंड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ८) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास गोखले नाका ते सावरकर चौक जाणाऱ्या रस्त्यावरील पोस्ट ऑफिसच्या समोरील पालिकेच्या पार्किंग परिसरात निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सिकंदर शहा हा विनापरवाना १० हजार रुपये किंमतीचा गांजा अमंली पदार्ख विक्री करताना सापडला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश सावंत यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.